डिव्हाईनचा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

‘गल्ली बॉय’ चित्रपटामधील डिव्हाईनच्या रॅपसाँगने तरुणाईला भुरळ घातली. डिव्हाईन म्हणतो, ‘रॅप म्युझिकमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.

रॅप म्युझिकच्या दुनियेतील सुप्रसिद्ध नाव म्हणजे डिव्हाईन. विवियन फर्नांडिस हे डिव्हाईनचे खरे नाव.

‘गल्ली बॉय’ चित्रपटामधील त्याच्या रॅपसाँगने तरुणाईला भुरळ घातली. आता डिव्हाईनचा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गल्ली लाईफ ः द स्टोरी ऑफ डिव्हाईन’ या माहितीपटामधून त्याचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात येणार आहे. डिव्हाईनला संगीताची आवड कशी निर्माण झाली, त्याचा प्रवास चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. हा चित्रपट ५० मिनिटांचा असेल.

डिव्हाईन म्हणतो, ‘रॅप म्युझिकमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. या चित्रपटामुळे माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.’ ‘रेड बुल मीडिया हाऊस’द्वारे निर्मित हा चित्रपट डिस्कव्हरी नेटवर्कवरील साऱ्या वाहिनींवर १ जुलैला प्रदर्शित होणार आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News