लवकरचं आपण बोलणार; एक होती 'आम'ची मुंबई...

विपुल साळुंखे
Monday, 17 June 2019

बरं चला लिहीत काय बसलोय, हे सगळं आधी मला माझ्या कॅमेर्यात शुट करुन ठेवुदेत, कारण उद्या आमच्या पोरांनासुद्धा जेव्हा आम्ही आमच्या वडलांसारखं, एक हाथ वर करुन फुल्ल स्टाईलमधे “अरे आमच्या काळात असं होतं.” 

मुंबईत हल्ली अशी खिडकी लाभायला भाग्य लागतं, मी  गम्मतीने तिला कर्जतच्या खिडकी-वड्यावरुन नाव ही ठेवलंय “गोरेगावचा खिडकी आंबा”, अशी दृश्य हल्ली ह्या काँक्रेटच्या वाढत्या जंगलात खुप दुर्मिळ होत चालली आहेत खरी, पण त्या मानाने आम्ही खुप लकी आहोत बाबा, आमच्या जनरेशनने (“पिढी” लिहायचं  मुद्दाम टाळलं उगाच मग पोक्त झाल्यासारखं वाटतं) दोन्हीकडे, म्हणजेच गावी आणी शहराकडेही हा हिरवागार निसर्ग ह्याची देही ह्याची डोळा पाहीलाय अनुभवलाय.

पण उद्या येणार्या नव्या पिढीचं थोडं अवघड होउन बसणार आहे बहुतेक. ह्याला जवाबदारही आपणंच आहोत म्हणा असो. हल्ली मुंबईत सर्रासपणे डेव्हलपमेंटच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल, जंगलांचं हळु हळु कमी होणं, खारफुटींच्या झाडांचं कमी होणं ही काही डेव्हलपमेंटची चिन्हं नाहीएत तर डेडलॉकमेंटची लक्षणं आहेत. आता ह्या गोष्टीला आवर घालणं जरा कठीणंच आहे, कारण हा डेव्हलपमेंट नामक बकासुर राक्षस हळु हळु मुंबईतलं होतं नव्हतं ते सगळंच नैसर्गीक सौंदर्य गिळंकृत करु पाहतोय.

मला आठवतंय शाळेत असताना आपण फॉसिल्सचा अभ्यास केला होता. त्यावेळी पुरातत्वशास्त्रज्ञ जमिनीतुन उत्खनन करुन अशी दगडं शोधुन काढायचे ज्यावर डायनॉसर्सच्या अस्तित्वांचे ठसे, त्याकाळातल्या जैववनस्पतिंचे ठसे असायचे तेव्हा ते आपण कीती कुतुहलाने पाहायचो.

आता कदाचित येणारी आगामी 5G,6G,7G वाली नवी पिढीं बहुदा वाघ, हत्ती, कावळा, चिमणी, आंबा, फणस ह्यांचेही फॉसिल्स अगदिच कुतुहलाने आणी कौतुकाने पाहतील. वर बढाया मारत हे ही बोलतील, “Guys you know what? माझ्या डॅडच्या मुंबईच्या घरासमोर “त्याकाळी” मॅंगोचं ट्री होतं, ज्याचे मॅंगोज् तो बेडरुमच्या खिडकीतुन हाताने तोडुन खायचा. मग दुसरा म्हणेल हे तर काहीच नाही, माझा डॅड एकदा आरेच्या फॉरेस्ट मधुन ऑफिसला चालला होता, तेव्हा तर त्याने लेपर्ड पाहीला होता ते पण लाईव्ह. मग तिसरा खोचकपणे बोलेल, ए पण तिथे आता जंगल नाहीए ना? दुसरा नाराज होउन Unfortunately no yaar...!!!” अशी म्हणत पोरं तोंड पाडतील.

मग आपणंच त्यांना मनवण्यासाठी त्याच ठीकाणी नव्याने सुरु झालेल्या “जंगल थिम पार्क” मधे २०००-३००० रुपयाचे टिकीट काढुन फिरायला नेऊ न्तिथे रोबोटिक्स आणी 5D 6D तंत्रज्ञानाने तयार केलेले वाईल्ड अॅनिमल्स ही दाखवु आणी त्यांची समजुत काढु.

बरं चला लिहीत काय बसलोय, हे सगळं आधी मला माझ्या कॅमेर्यात शुट करुन ठेवुदेत, कारण उद्या आमच्या पोरांनासुद्धा जेव्हा आम्ही आमच्या वडलांसारखं, एक हाथ वर करुन फुल्ल स्टाईलमधे “अरे आमच्या काळात असं होतं.” 

हे सांगायला जाऊ तेव्हा ते सगळ्या गोष्टींचा “Proof” मागुन आपल्याला कैचित पकडण्याचा प्रयत्नही करतील. आयत्यावेळी त्यांच्यासमोर आपला पोपट होऊ नये त्यासाठी चाललेला हा खटाटोप. म्हणुन सांगतोय चांगल्या गोष्टींचं जतन करुन त्यांना जपुयात, त्यांचे पुरावे जमा करुन ठेऊयात.

कारण ह्याच चांगल्या गोष्टींचा उल्लेख उद्या आपल्या “चिऊ-काऊंच्या गोष्टींत” होणार आहे. रात्री डोळे चोळत चोळत मुलं आपल्याजवळ येउन गोष्टं सांगण्यासाठी हट्ट करतील, "डॅडा मस्त Story सांग ना. विचारेन कोणती? मग ते म्हणतील, आम्हाला फिल्मी नको आपल्या मुंबईची सांग रियल स्टोरी, मग स्टोरी सुरु होते,
"एक होती आमची मुंबई...!!!"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News