सुखी जीवनाचा कानमंत्र

सागर संभाजी पिसाळ
Wednesday, 31 July 2019

सध्याच्या धावपळीच्या युगात दैनंदिनी जीवनात मानसिक तान - तणावाचा प्रत्येकालाच सामना करावा लागतो. खरं तर मानवी जीवन हे जणू देवाने आपल्याला आनंद लुटण्यासाठी दिलेलं वरदानच आहे. पण खरा जीवनाचा आनंद कशात आहे हे आपल्याला नीटसं माहीत नसल्याने, आनंद शोधण्याची आपली व्याख्या चुकीच्या दिशेने जाते.

सध्याच्या धावपळीच्या युगात दैनंदिनी जीवनात मानसिक तान - तणावाचा प्रत्येकालाच सामना करावा लागतो. खरं तर मानवी जीवन हे जणू देवाने आपल्याला आनंद लुटण्यासाठी दिलेलं वरदानच आहे. पण खरा जीवनाचा आनंद कशात आहे हे आपल्याला नीटसं माहीत नसल्याने, आनंद शोधण्याची आपली व्याख्या चुकीच्या दिशेने जाते.

मानवी जीवनासाठी पैसा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पैश्याने आपल्या गरजा पूर्ण होतील पण त्याने आपण मानसिक समाधान विकत घेऊ शकत नाही. ते आंतरिक सुख आपण योग्य विचारमंथनातुनच साध्य करू शकतो.
मानवी दुःखाच खरं कारण काय असेल तर ते आहे आपल्या अमर्याद अपूर्ण अपेक्षा मग त्या आर्थिक स्वरूपातील असोत किंवा मानवी नाते - संबंधातील असोत.मग मनुष्याने अपेक्षाच ठेऊ नयेत का असा तुम्हाला प्रश्न पडेल.

जीवन जगत असताना ध्येय जरूर ठेवावीत पण ती मिळविण्यासाठी अपेक्षांची आसक्ती नको. अनासक्त भावनेने ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नातून पाठपुरावा केला पाहिजे, कारण ही आसक्ती अटळ समाधान देऊ शकत नाही. अपेक्षा या काल्पनिक रंजक स्वप्न आहेत, त्याला वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी कृतीची जोड हवी. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की "कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेऊ नका".

त्याचप्रमाणे आपण आपल्या कर्मावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जर आपले कर्म योग्य आणि प्रामाणिक असेल तर तुम्हाला त्याच आपोआप योग्य फळ मिळेल. अपूर्ण अपेक्षांच शल्य मनाला टोचत ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवणं कधीही श्रेयस्कर.

कारण हे कर्मच कृतिशील आहे .अपेक्षा या फक्त विचारात सीमित आहेत, आणि विचारातून निर्माण होणाऱ्या दुःखाला कोणताच भौतिक आधार नाही. त्याचप्रमाणे आनंदाच आहे. आनंद स्वअनुभुती करण्यात आहे. आपल्या मानण्यावर आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News