देवगिरी महाविद्यालयाचा "ई2डे" विभाग, विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व उद्योजक बनवणार

अतुल पाटील 
Tuesday, 16 July 2019
  • विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्यासाठी "एम्प्लॉयबिलिटी ऍण्ड एंटरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट एन्डेव्हर' (ई2डे) विभागाची स्थापना
  • अभ्यासक्रमाची सुरवात 1 ऑगस्ट 2019 पासून होणार

औरंगाबाद: देवगिरी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्यासाठी "एम्प्लॉयबिलिटी ऍण्ड एंटरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट एन्डेव्हर' (ई2डे) विभागाची स्थापना केली आहे. अभ्यासक्रमाची सुरवात 1 ऑगस्ट 2019 पासून होणार आहे. अशी माहिती "मशिप्र' मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, कार्यकारणी सदस्य विवेक भोसले यांनी दिली. 

विभागाअंतर्गत करिअर समुपदेशन, उद्योजकता विकास, सर्व समावेशी शिक्षण पद्धती, स्मार्ट क्‍लासरुम विकास, उद्योजकता जागरुकता, सामाजिक आणि व्यावसायिक प्रोजेक्‍टस्‌, ई4 विकास, रोजगार क्षमता व नोकरी, व्होकेशनल स्कील्स्‌ डेव्हलपमेंट, इन्क्‍युबेशन सेल असणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्वयंव्यवसायासाठी प्रेरणा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नोकरीच्या संधीची माहिती हा उद्देश असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. 

"ई2डे' अभ्यासक्रम आराखड्यासाठी उद्योजक डॉ. व्ही. एस. देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन केली आहे. प्रत्येकी एक वर्षाचा अभ्यासक्रम असेल. एका वर्गात फक्‍त 30 विद्यार्थी असतील. पारंपारिक शिक्षण पद्धतीस फाटा देत सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गटचर्चा, वादविवाद, सादरीकरणासोबत प्रभावी अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. नव्या विभागाचे प्रमुख प्रा. रमण करडे असणार आहेत. 
 

असा असेल अभ्यासक्रम... 
"ई2डे" मध्ये दोन विभाग आहेत. एन्टरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट या कोर्सच्या माध्यमातून व्यवसाय कौशल्यांचा विकास, स्टार्टअप्सना भेट, यशस्वी उद्योजकांशी संवाद, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, कंपन्यांचा केसस्टडी, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनचा समावेश असणार आहे. प्रोजेक्‍टच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना कौशल्याचा उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. तसेच "ई4' म्हणजेच इंग्लिश, इलोक्‍वेन्स, एटिकेट, इकॉनॉमिक्‍स या कोर्सच्या माध्यमातून अनुभवी प्रशिक्षक अणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News