शिवकालीन वारसा जपणारे दुर्गवीर प्रतिष्ठान

जितेंद्र शिंदे
Thursday, 31 January 2019

सीमाभागातील एकाद्या किल्ल्यावर संवर्धनाचे काम पूर्ण झाले तरी त्या गडावर सातत्याने काम सुरु ठेवण्यात आले आहे. तसेच गडांच्या पायथ्याशी आणि परिसरात असणाऱ्या धनगर आणि गवळी वाड्यांतील मुलांना शालेय साहित्य, तसेच सोलार दिव्यांचे वाटप दरवर्षी केले जात आहे

शहरात सामाजिक उपक्रम राबविण्याऱ्या खानापुर तालुका बेळगाव रहिवाशी संघटनेतर्फे बेळगावात मुंबई येथील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सहकार्याने २०१५ साली शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दोन दिवशीय प्रदर्शनावेळी गड- किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना नाव नोंदविण्याची सुचना करण्यात आली होती. नाव नोंदवलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधुन दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी सीमाभागातील गड-किल्ल्यांचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दुर्गवीरच्या माध्यमातून अभिजीत अष्टेकर, बाबू हणमशेट, संदीप गावडे, किरण बडवाण्णाचे, नरेश जाधव, सागर मुतगेकर, नितीन पाटील, अमोल केसरकर, गजानन बाडीवाले, बाबू घोरे, बाबू जानकर, आशुतोष कांबळे, विठ्‌ठल हणमेशट या मोजक्‍या कार्यकर्त्यांनी चंदगड तालुक्‍यातील एक महत्वाचा किल्ला असणाऱ्या कलानिधी गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. त्यानंतर वल्लभगड, महिपाळगड या गडांवर काम सुरु करण्यात आले आहे. यापुढे खानापूर तालुक्‍यातील घनदाट जंगलातील सडा किल्ल्यावर आणि हुक्‍केरी तालुक्‍यातील होण्णूर किल्ल्यावर काही दिवसांतच काम सुर करण्यात येणार आहे. 

दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी किल्ल्यांवर जाऊन कार्यकर्ते बुरुंजावर वाढलेले गवत, झुडपे काढतात. तसेच जुनी मंदिरे, जुन्या वास्तूची डागडूगी केली जात असून विहिरींत साचलेला गाळ काढुन विहीरींचे पुर्नरूज्जीवन केले जात आहे. पायऱ्या आणि इतर ठिकाणी डागडुगी करण्यात आली आहे. तसेच किल्ल्याची माहिती देणारे माहिती फलक लावण्यात आले, आहेत. त्यामुळेच भव्य आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गडावर न येणारे विविध भागातील लोकही गड पाहण्यासाठी दररोज गर्दी करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा तयार करताना लोककल्याण, स्वराज्याचा विस्तार या गोष्टींचा विचार केला होता. यापासून प्रेरणा घेत दुर्गवीरच्या कार्यात बेळगाव, खानापूर, चंदगड, संकेश्‍वर भागातील युवक युवती गडकोटांच्या संवर्धनासाठी 2015 पासुन झटत आहेत. संकेश्‍वर येथील महेश मिलके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वल्लभगडाचे संवर्धन करताना तहान- भूक हरवून काम केल्याचे गडाला भेट दिल्यांनतर दिसुन येते. 

कर्नाटक सरकार विविध प्रकारे सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असते. त्याच प्रमाणे कर्नाटक सरकार सीमाभागातील गडांच्या संवर्धनासाठीही पुढे येत नाही. मात्र बेळगाव आणि परिसरातील दुर्गवीर रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी आठवडाभराचे काम, कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला की एकत्र येतात आणि गडांच्या मोहिमेवर निघतात. सकाळी ९ वाजता युवक गडावंर पोहचतात. त्यानंतर श्रमदान मोहीम सुरु करण्यात येते. याचबरोबर दुर्ग भ्रमंती मोहीम आयोजित करुन युवा वर्गाला इतिहासाची माहिती देण्यात येत आहे. संवर्धनाचे काम सुरु ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशील संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. गडांवर शिवजयंती, शिवराज्याभिषेक, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी सण उत्साहाने व मराठमोळ्या पद्धतीने गड परिसरात साजरा केला जात आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक गड, किल्ले बेळगाव आणि सीमाभागात आहेत. त्यामुळे सीमाभागातील गड, किल्ल्यांना मोठा इतिहास आहे. परंतु सरकार आणि पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे बेळगाव, खानापूर, चंदगड, हुक्‍केरी तालुक्‍यातील अनेक गड, किल्ल्यांची पडझड होत आहे. त्यामुळे सीमाभागातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी २०१६ पासून बेळगाव शहर आणि परीसरातील १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी स्व-खर्चाने काम हाती घेतले आहे. बेळगावकरांच्या कार्याला दुर्गवीर प्रतिष्ठानची साथ मिळत असुन कलानिधीगड, सडा, वल्लभगड, महिपाळगड येथे गड संवर्धनाचे काम सुरु आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी 

 

आपली महत्वाची कामे बाजुला ठेऊन अनेक गडांच्या डागडुजीसाठी सुरु असलेले सीमाभागातील युवकांचे कार्य सर्वासाठी 
प्रेरणादायी ठरु लागले आहे. - मिलिंद देसाई, बेळगाव. 

 .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News