सेतू केंद्रांवरील सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढू लागली आहे.

पिंजर - विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढू लागली आहे. सोबतच प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालये तसेच सेतू केंद्रावर गर्दी केली आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे. प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उशीर होत असून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

शाळा महाविद्यालयांमध्ये विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांची धूम सुरू आहे. परंतु सेतू केंद्रातील सर्व नेहमीच जाऊन राहत असल्याने विद्यार्थ्यांची पंचायत होत आहे. एका महिन्यापासून साधा उत्पन्न दाखला सुद्धा विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना वारंवार सेतू केंद्र चकरा माराव्या लागत आहेत. काम लवकर व्हावे म्हणून पिंजर सर्कल मधील विद्यार्थी बार्शीटाकळी येथील सेतू केंद्रावर धाव घेतात.

विविध प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी आवश्यक ते कागदपत्र सादर करतात. परंतु, सेतू केंद्रावरील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते.  संवादामध्ये वेळ गमावला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूरवरून सेतू केंद्रावर यावे लागते त्यांचा वेळ तर वाया जातोच शिवाय पैसाही वाया जातो आहे. यामुळे वेळेवर प्रमाणपत्र मिळावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो. कागदपत्रासंबंधीची कामे त्वरीत करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अडचणी सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.
- गजानन हामंद, तहसीलदार, बार्शीटाकळी

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News