वाढत्या बेरोजगारीने जिल्ह्यातील तरुणाई त्रस्त

जालिंदर धांडे
Sunday, 23 June 2019
  • नौकरीच्या सोधात युवकांची मोठ्या शहरांकडे ओढ
  • येथील युवकांपुढे समस्यांचा डोंगर
  • जिल्ह्यात मोठ मोठे उद्योग उभारण्याची गरज

बीड: जिल्हा हा सर्वत्र ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. परंतु सध्या जिल्ह्यातील यवुक ऊसतोड कामगार ही ओळख पुसण्यासाठी मोठे कष्ट घेत आहेत. परंतु सध्या जिल्ह्यात शिक्षण पुर्ण होऊनही अनेकांना नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील युवक सध्या मोठ्या प्रमाणात शहरांकडे नोकरीच्या सोधात स्थलांतर करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील युवकांना इच्छा नसतानाही आई-वडीलांना सोडुन पोटा- पाण्यासाठी स्थलांतर होण्याची वेळ आली आहे.
 
जिल्ह्यातील युवक सध्या सर्वच क्षेत चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत. पुर्वी जिल्ह्यातील युवक जास्त प्रमाणात शिक्षण घेत नव्हते. परंतु सध्या जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात आलेले आहेत. शहरी भागासह ग्रामिण भागातील युवका एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षांची तयारी करत आहेत. परंतु यातील अनेक युवकांची अर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे, त्यांना अर्धावेळ अभ्यास करुन अर्धावेळ काम करावा लागत आहे. 

परंतु सध्या जिल्ह्यात लहान मोठे कोणतेच कामे हाताला मिळत नसुन, जिल्ह्यातील तरुणाई बेरोजगारीने त्रस्त झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील युवक सध्या पुणे, मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांकडे नोकरीच्या शोधात स्थलांतर होत आहे. सध्या जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न युवकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना येणाऱ्या अडी-अडचणी प्रशासनाने तात्काळ सोडाव्यात अशी मागणी जिल्ह्यातील युवक करत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News