पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित 

आशा साळवी
Sunday, 4 August 2019

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका भागात मुसळधार पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारी म्हणून काही भागातील वीज पुरवठा महावितरणला आज (ता.4) सकाळपासून बंद ठेवावा लागला. तेव्हा ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे. 

रविवारी सकाळपासून पिंपरी चिंचवड महानगर पालिका भागातील नद्यांमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने सखल भागात पाणी साचले. नागरिकाच्या सुरक्षेसाठी काही भागातील वीज यंत्रणा सकाळपासून बंद ठेवण्यात आली. त्याप्रमाणे काही भागात वीज वाहिनीवर झाडे पडल्याने व फिडर पिलर मध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद ठेवावा लागला. मुळा, मुठा, पवना व रामनदी नदीकाठी असलेल्या काही सखल भागात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. 

औध, बोपोडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, मधुबन कॉलनी, जुनी संघवी, वाकड गावठाण, कस्पटे वस्ती, पवनानगर, चिंचवड, पिंपळे निलख, कासारवाडी, काळेवाडी, शिवतीर्थ, इ.भागातील काही वस्त्यांमधील रोहित्रे पाण्याखाली आल्यामुळे तेथील वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवावा लागला. जिल्हा प्रशासनाने पुढील 48 तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचे कळविले असून महावितरणला नागरिकाच्या सुरक्षतेसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News