जंजिरे-अर्नाळा किल्ल्यावर दारूबंदीचा नारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 October 2019

सकाळीच समस्त दुर्गमित्र प्रतिनिधींनी जंजिरे अर्नाळा किल्ल्यातील दर्या दरवाजा, दिंडी दरवाजा येथे परंपरेप्रमाणे पूजन केले. या वेळी वास्तू देवता, समुद्र देवता, राजा शिवछत्रपती प्रतिमेचे पूजन केले. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्चेबांधणी करत दुर्गमित्रांनी दारूबंदीचा नारा दिला.

दसऱ्यानिमित्त दुर्गमित्रांची मोहीम; प्लास्टिकबंदीसाठीही पुढाकार; परंपरेनुसार देवतांचे पूजन - किल्ले वसई मोहीम परिवार, पालघरमधील युवा शक्ती प्रतिष्ठान, राज्य दुर्गमित्र परिवार, पालघरमधील उत्तर कोकण मोडी लिपी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दसऱ्यानिमित्त जंजिरे-अर्नाळा किल्ल्यावर दारूबंदीसाठी मोहीम राबवण्यात आली.

सकाळीच समस्त दुर्गमित्र प्रतिनिधींनी जंजिरे अर्नाळा किल्ल्यातील दर्या दरवाजा, दिंडी दरवाजा येथे परंपरेप्रमाणे पूजन केले. या वेळी वास्तू देवता, समुद्र देवता, राजा शिवछत्रपती प्रतिमेचे पूजन केले. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्चेबांधणी करत दुर्गमित्रांनी दारूबंदीचा नारा दिला.

मोहिमेत किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी आकाश जाधव यांनी दुर्गमित्रांना जंजिरे अर्नाळा किल्ला सफर घडवत इतिहास मार्गदर्शन केले. किल्ल्यातील श्री कालिका देवी होम पूजन निमित्ताने दर वर्षी दसरा सणानिमित्त दिवसभरात किमान १५ हजारहून अधिक भाविक पर्यटक येतात. यातील ९० टक्‍क्‍यांहून अधिक मंडळी किल्ल्यातील बुरुज तटबंदीवर व दर्गा परिसरात दारू पिण्यासाठी जातात.

गेल्या काही वर्षांत दुर्गमित्रांनी केलेल्या आवाहनास स्थानिक ग्रामस्थांनी पूर्णतः सहकार्य करत योगदान दिले, तरीही काही नवीन हौशी पर्यटक व भाविक छुप्या मार्गांनी दारू नेत असताना त्यांना पकडण्यात आले. दुर्गमित्रांनी किल्ल्यावर विखुरलेल्या काही जुन्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्यांसह अन्य कचरा जमा केला.

दिवसभराच्या वाढत्या उन्हात दुर्गमित्रांनी दारूबंदीसाठी कठोर परिश्रम घेतले. विविध प्रातांतील पर्यटक, दुर्गमित्र, अभ्यासक, स्थानिक यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. स्थानिक ग्रामस्थ आणि देवीच्या दर्शनासाठी येणारा भाविक यांच्यात दारूबंदी व प्लास्टिक बंदी या विषयावर होणारा सकारात्मक बदल हेच उपक्रमाचे उद्दिष्ट्य होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News