हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर कॉफी सेवनाची 'ही' मर्यादा लक्षात ठेवा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका रिपोर्टनुसार दिवसांतून सहा  कपपेक्षा कॉफी घेणं हे आरोग्यास घातक ठरू शकतं.

दिवसांतून सहा कपहून अधिक कॉफीचं सेवन केल्यास हृदय विकाराचा धोका  हा २२ % ने वाढतो असं अभ्यासातून समोर आलं आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे उच्च  रक्तदाब आणि  हृदयविकारचा धोका अधिक जाणवतो असं म्हटलं आहे. क्षीण घालवण्यासाठी काहीजण कॉफी घेतात. मात्र कधी कधी या पेयाचा  अतिरेकही  होतो. कोणत्याही सवयीनं मर्यादा ओलांडली की  ती आरोग्यास घातक ठरते.

दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका रिपोर्टनुसार दिवसांतून सहा  कपपेक्षा कॉफी घेणं हे आरोग्यास घातक ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो मात्र योग्य काळजी घेतली तर हा धोका टळू शकतो. 

हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर कॉफी  सेवनाची ही योग्य मर्यादा आहे असं द अमेरिकन  जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशिअननं म्हटलं आहे. कॉफी हा जगातील सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयापैकी एक आहे. कंटाळा घालवण्यासाठी अनेक जण या पेयाचं सेवन करतात मात्र आरोग्याचे  संभाव्य धोके टाळायचे असल्यास कॉफी  मर्यादेतच घ्या असं संशोधनातून समोर आलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News