अखेर भारताच्या टॉप ड्रीम इलेव्हन ॲपला न्यायालयाचा सहारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

मुंबई - ड्रीम इलेव्हन या मोबाईल ॲपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. क्रिकेटच्या सामन्याआधी खेळल्या जाणाऱ्या या मोबाईल गेमचा सट्टेबाजी किंवा जुगाराशी कोणताही संबंध नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १९) स्पष्ट केले आणि या गेमला विरोध करणारी जनहित याचिका नामंजूर केली.

मुंबई - ड्रीम इलेव्हन या मोबाईल ॲपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. क्रिकेटच्या सामन्याआधी खेळल्या जाणाऱ्या या मोबाईल गेमचा सट्टेबाजी किंवा जुगाराशी कोणताही संबंध नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १९) स्पष्ट केले आणि या गेमला विरोध करणारी जनहित याचिका नामंजूर केली.

क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी मोबाईलवर ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या गेमविरोधात न्यायालयात सामाजिक कार्यकर्ता गुरदित सच्चर यांनी याचिका केली होती. सामना सुरू होण्याआधी गेम खेळणाऱ्याला स्वतःच्या पसंतीचा ११ जणांचा संघ निवडायचा असतो. ज्या नेटकर खेळाडूची संघनिवड अचूक असेल, त्याला ॲपकडून बक्षीस म्हणून पैसे मिळतात.

मात्र, अशा प्रकारच्या खेळ पद्धतीमुळे जुगार आणि सट्टेबाजी केली जात आहे, असा आरोप याचिकादाराने केला होता. तसेच ॲपधारकांकडून कोणताही वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरला जात नाही, असे याचिकादारांनी निदर्शनास आणले होते. याचिकेवर न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हा केवळ ऑनलाईन गेम असून, या खेळातून कोणत्याही प्रकारच्या जुगाराला प्रोत्साहन दिले जात नाही, असे ॲपच्या वतीने सांगण्यात आले. तसेच कोणतीही सेवा देण्यासाठी या खेळाचा वापर केला जात नसल्यामुळे जीएसटी लागण्याचाही प्रश्‍न निर्माण होत नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. 

बौद्धिक खेळ असल्याचा दाखला
पंजाब-हरियाना न्यायालयात अशाच प्रकारची याचिका दाखल झाली होती; मात्र हा बौद्धिक खेळ असल्याचे मत न्यायालयाने दिले होते. त्यामुळे हा ऑनलाईन गेम खेळण्याबाबत कुशलता वापरावी लागते, असे निकालामध्ये म्हटले आहे. खंडपीठाने या निकालाचा दाखला घेऊन याचिका नामंजूर केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News