विद्या विकास महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन याची १२७ वी जयंती साजरी

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Monday, 19 August 2019
  • ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली.
  • उपप्राचार्य यांनी  डॉ.रंगनाथन यांच्या एकूणच योगदानावर प्रकाश टाकला. डॉ.रंगनाथन यांनी भारतीय माणूस आणि ग्रंथालययाचा संबंध उलगडून दाखवला तर अध्यक्षीय भाषणातुन प्राचार्य डॉ.रमेश बोबाटे यांनी ग्रंथाचे मानवी जीवनांत किती महत्व आहे यांचा विचार मांडला.

समुद्रपुर:  दि.12 रोजी मंगळवारला विद्या विकास महाविद्यालयात समुद्रपुर येथे ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बोबाटे, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राजविलास कारमोरे उपस्थित होते. उपप्राचार्य यांनी  डॉ.रंगनाथन यांच्या एकूणच योगदानावर प्रकाश टाकला. डॉ.रंगनाथन यांनी भारतीय माणूस आणि ग्रंथालययाचा संबंध उलगडून दाखवला तर अध्यक्षीय भाषणातुन प्राचार्य डॉ.रमेश बोबाटे यांनी ग्रंथाचे मानवी जीवनांत किती महत्व आहे यांचा विचार मांडला.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.डॉ.नयना शिरभाते, डॉ.ईश्वर सोमनाथे, आकाश भगत, सूरज सेलकर, प्रा.विलास बैलमारे, प्रदीप कापकर, प्रतिभा इटनकर, डॉ.कळसंकर, डॉ.रामटेके यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालक ग्रंथपाल प्रा.प्रमोद अलोने यांनी केले तर आभार प्रा.डॉ.मिलींद कांबळे यांनी मानले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News