डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी 30 जुनला मुलाखती

अतुल पाटील
Monday, 17 June 2019
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठीच्या मुलाखती 30 जुनला मुंबईत होणार आहेत.
  • यासाठी 18 जणांची नावे अंतिम करण्यात आली आहेत.18 जणांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. 
  • 18 नावे मुलाखतीसाठी अंतिम करण्यात आली आहेत.
  • त्यांची मुलाखत 30 जुनला मुंबईत होणार आहे. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठीच्या मुलाखती 30 जुनला मुंबईत होणार आहेत. यासाठी 18 जणांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. यात औरंगाबाद येथील विद्यापीठातील तीन नावांनाच पसंती मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू कुलगुरु म्हणून कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांची निवड झाली आहे. दरम्यान, कुलगुरु पदासाठीची प्रक्रिया सुरु आहे. अनेक इच्छुकांपैकी 18 नावे मुलाखतीसाठी अंतिम करण्यात आली आहेत. त्यांची मुलाखत 30 जुनला मुंबईत होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी बीसीयुडी संचालक प्रा. के. व्ही. काळे, माजी परीक्षा नियंत्रक सध्या पुणे विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले डॉ. अशोक चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक सध्या नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. डी. व्ही. माने यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. 

औरंगाबादशिवाय नांदेड येथील श्री. खंदारे, श्री. वाघमारे, पुणे येथील शिक्षण विभागातील श्री. सोनवणे, नागपुर येथील प्र-कुलगुरु श्री. येवले, श्री. देशमुख, कोल्हापुर येथील श्री. फुलारे यांची नावेही मुलाखतीसाठी असल्याचे विद्यापीठातील राज्यपाल प्रतिनिधी किशोर शितोळे यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News