डॉ अमोल कोल्हे म्हणाले, राजे विरोध तुम्हाला नाही तर...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 October 2019

साता-यातल्या कोरेगावमध्ये सभा आयोजित राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत अमोल कोल्हेंनी उदयनराजेंच्या भाजपत जाण्यावर आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की, राजे विरोध तुम्हाला नाही तर महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणाऱ्यांना, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आहे.

सातारा : साता-यातल्या कोरेगावमध्ये सभा आयोजित राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत अमोल कोल्हेंनी उदयनराजेंच्या भाजपत जाण्यावर आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की, राजे विरोध तुम्हाला नाही तर महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणाऱ्यांना, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आहे. आम्ही त्यांना विरोध करणारच, साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

 यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. ज्या दिल्लीच्या तख्तालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते. त्या तख्तासमोर महाराष्ट्राची मान झुकू नये, हीच एक भावना उदयनराजेंच्या भाजपाप्रवेशावेळी मनात होती. त्यांना आमचा विरोध नाही तर भाजप सरकारला आहे, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News