डॉ. अमोल कोल्हे हे शिरूरपुरते मर्यादित नाही; राष्ट्रवादी देणार ही मोठी जबाबदारी  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.

पुणे : अभिनेते आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. आगामी निवडणुकीसाठी त्याचप्रमाणात यश राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे पहायला मिळत आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मोठी जबाबदारी देणार असल्याचं समोर येत आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. 

डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना उत्तर देताना डॉ. अमोल कोल्हे हे आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले होते. आगामी निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर फिरायचे आहे. त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. ते भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित नाहीत, अशी पवार यावेळी म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News