सहा वर्षांच्या पावसाळ्यात मुंबईत तब्बल ३ हजार ३२३ इमारतींची पडझड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • मुंबईत २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ३३२३ घरे अथवा घरांचे भाग, भिंती, इमारती अथवा इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना

मुंबई - पुण्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शुक्रवारी (ता. २८) भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सहा वर्षांत पावसाळ्यात ३३२३ इमारतींचे भाग किंवा भिंती कोसळून २४९ बळी गेले आणि ९१९ जण जखमी झाल्याचे माहिती अधिकार अर्जाला महापालिकेने दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २०१३ पासून २०१८ पर्यंत पावसाळ्यातील इमारत दुर्घटना आणि बळी व जखमींचा तपशील अर्जाद्वारे मागितला होता. त्यानुसार महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा सहायक अभियंता सुनील जाधव यांनी माहिती दिली. 

मुंबईत २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ३३२३ घरे अथवा घरांचे भाग, भिंती, इमारती अथवा इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनांत एकूण २४९ व्यक्तींचा मृत्यू झाला आणि ९१९ जण जखमी झाले, असा तपशील त्यांनी दिल्याचे शेख यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News