येथे चक्क "पिंडा"ला शिवण्यासाठी कावळे मिळतात..!

विशालराज पाटील
Monday, 29 July 2019
  • शिरंबे (ता. कोरेगाव) येथील सचिन माने यांनी चार कावळे पाळले असून, मागणीनुसार ते ही मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. 

कोरेगाव : पिंडाला असुद्या नाही तर सावडण्याच्या विधीवेळी "नैवद्या'ला कावळा शिवला नाही तर कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईकांच्या मनात रुखरुख राहते. ही रुखरुख राहू नये यासाठी आकाशातून कावळा नाही आला तरी आता काही हरकत नाही. शिरंबे (ता. कोरेगाव) येथील सचिन माने यांनी चार कावळे पाळले असून, मागणीनुसार ते ही मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. 

कावळा हा तसा काही माणसाचा प्रिय प्राणी नाही. अगदी पुराणातही त्याला दुषणे देऊन तसा त्याला दुरचे ठेवला आहे. एरव्ही किळसवाणा, नकोसा वाटणाऱ्या, काव काव करुन भंडावून सोडणाऱ्या या पक्षाची मात्र एखाद्याचे निधन झाल्यानंतर सावडण्याच्या विधीवेळी मात्र सारेजण स्मशानभुमीत वाट पहात राहतात. निधनानंतर सावडण्याच्या विधीवेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ विधीवेळी ठेवतात.

त्याला कावळा शिवला तर निधन झालेल्या व्यक्तीच्या काही मागे आशा राहिलेल्या नाहीत, असे समजले जाते. काही वेळा कावळे लगेचच नैवद्यावर झडप घालतात. मात्र, काही वेळा ते वाट पाहूनही येत नाहीत. यामध्ये श्रद्धा - अंधश्रद्धा काहीही असोत मात्र भले भले (सुशिक्षित, उच्चशिक्षित) कावळ्याची वाट पहात स्मशानभुमीत तासन तास ताटकळतात. बऱ्याचवेळा कावळा येतच नाही. मग गायीला आणून नैवद्य तिला दिला जातो. तरीही कावळा शिवला नाही याची सर्वांच्याच मनात रुखरुख राहते. 

नागरीकांची ही रुखरुख दुर करण्यासाठी आता श्री. माने यांनी चक्क कावळेच पाळले आहेत. ते ही हौसेने. आता कोणी या कावळ्यांची गरज व्यक्त केलीच तर ते तातडीने तेथे कावळे घेऊन जातात.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News