आज लोकल बंद म्हणून घाबरू नका; बसच्या 100 फेऱ्या वाढल्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019

पुणे : पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बस प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून प्रवांशाच्या संख्येनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

रविवारी सकाळपासून प्रवाशांची संख्या वाढल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 20 गाड्या आणि 30 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात सुमारे 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  तसेच सुमारे 130 फेऱ्या वाढविल्या जाणार असल्याचे शिवाजीनगर आगार प्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले.

 दरम्यान, प्रवाशांच्या संख्येप्रमाणे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे भिसे यांनी सांगितले. या गाड्या पुणे स्टेशन बस स्थानक आणि स्वारगेट बस स्थानकातून मुंबईसाठी सोडण्यात येत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News