जीवनदीपमध्ये "प्रशासकीय मराठी" विषयावर व्याख्यान संपन्न

डॉ. राहुल तौर
Monday, 1 April 2019

कल्याण - जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेलीच्या  मराठी विभागा तर्फे ‘प्रशासकीय मराठी' या विषयावर  मंत्रालयाच्या भाषा संचालनालय विभागातील संचालक श्री. आनंद गांगण यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मराठी भाषेचा प्रशासक सेवेमध्ये कशा प्रकारे वापर केला जातो,ते विद्यार्थ्यांना समजण्यासाठी “प्रशासनातील मराठी भाषा व रोजगार संधी”या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना श्री गांगण म्हणाले, प्रशासनामध्ये न्यायालय, मंत्रालय, शाळा, महाविद्यालय आणि शासनाने विविध कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो, तसेच प्रशासकीय सेवेमध्ये मराठी भाषेचा वापर होतो. स्वज्ञा संकल्पना कोश, विश्वकोश अशा विविध मराठी भाषा ही समृद्ध कशी केली जाईल, या दृष्टिकोनातून उपक्रम आयोजित केले जातात. अनंत गांगण यांनी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी कोरे, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. हरेंद्र सोष्ट, प्रा.दौलतराव कांबळे, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News