पार्टनर्स सोबत 'या' गोष्टी केल्याने प्रेम अधिक खुलत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलेशनशिपमध्ये रोमॅंटिक ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला. त्यानंतर निष्कर्ष काढले आणि 'पर्सनल रिलेशनशिप' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केले. संशोधनाचा निष्कर्ष खालील प्रमाने  
 

एकमेकांसोबत हसत- खेळत राहणे
जे कपल्स एकमेकांसोबत हसत-खेळत राहतात. गंमती-जमती करतात, खोड्या काढण्याचा प्रयत्न करतात, ते फार जास्त काळ सोबत राहण्याची शक्यता असते. त्यांच प्रेम अधिक खुलत असत.

 

हसण्याचा अर्थ खिल्ली उडवणे नाही
मस्ती करण्याचा अर्थ पार्टनरची खिल्ली उडवणे असा नाही. जे जोक्स केवळ दोन व्यक्तींमध्येच होऊ शकतात आणि ज्यांचा उद्देश केवळ हसणे हा असतो, या जोक्सच्या माध्यमातून नातं अधिक मजबूत होतं. 

अश्लिल जोक्स करणे टाळावे
जे कपल्स एकमेकांसोबत अश्लिल गंमत करतात किंवा एकमेकांना चिडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं नातं जास्त काळ चालत नाही. कारण याप्रकारच्या जोक्सवरून असं दिसतं की, तुमच्या नात्यात काही तरी चुक आहे. त्यामुळे अश्लिल जोक्स करणे टाळावे.

प्रेमात सेन्स ऑफ ह्यूमर महत्त्वाचा
रिलेशनशिपमध्ये पार्टनर्स सोबत हसणं, एकमेकांची गंमत करणं गरजेचं असतं. त्यामुळे नात अधिक घट्ट होत. तसेच नात्यात सुरक्षेची भावनाही तयार होते. इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत आनंद शेअर करता तेव्हा दोघांमधील रोमॅंटिक अट्रॅक्शनही वाढतं'.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News