#NaariShakti चक्क तिने रुग्णवाहिका चालवून महिलेचे प्राण वाचवले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 6 October 2019

महिला डॉक्टरने रुग्णवाहिका चालविली आणि गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केले

मेघालय - आपण अनेक महिलांचे उदाहरण पाहातो की त्या काहीवेळा देवदूत म्हणून समाजासमोर उभ्या राहातात, अशीच एक डॉक्टर महिला एका गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरल्या आहेत. मेघालयातील तूरा या ठिकाणी असलेल्या प्रसूती व बाल रुग्णालय (एमसीएच) येथे काम करणाऱ्या डॉक्टर संगमा यांनी आज एका महिलेला आणि बाळाला जीवदान दिले आहे.
 
मेगालयातील गरोबाधा पीएचसी या दुर्गम भागात राहाणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक त्रास सुरू झाला. तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, काही वैद्यकिय तपासण्यांच्या अभावी तिथल्या डॉक्टरांनी शहरातल्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

रुग्णवाहिकेशी संपर्क केल्यावर चक्क प्रसूती व बाल रुग्णालय (एमसीएच), तुरा येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर संगमा यांनी रुग्णवाहिका चालवून त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टर संगमा यांच्या या धाडसामुळे आज एका महिलेचे आणि लहान बालाचे प्राण वाचले. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. संगमा यांचे कौतूक केले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News