नोकरी करत वरकमाई करा; अ‍ॅमेझॉनकडून ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या वस्तू लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्रयत्नशील आहे. आता जास्त मागणीच्या वेळी लवकरात लवकर ग्राहकांना वस्तू नेऊन देण्यासाठी अ‍ॅमेझॉनने नवी योजना आणली आहे.

मुंबई :ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या वस्तू लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्रयत्नशील आहे. आता जास्त मागणीच्या वेळी लवकरात लवकर ग्राहकांना वस्तू नेऊन देण्यासाठी अ‍ॅमेझॉनने नवी योजना आणली आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुण, गृहिणी आणि निवृत्ती स्वीकारलेल्या व्यक्ती आपापल्या पद्धतीने अर्धवेळ काम करून पैसे कमावू शकणार आहेत.  

कमीत कमी वेळेत ग्राहकांना त्यांची वस्तू नेऊन देणे हे 'ई कॉमर्स' क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सर्वात गरजेचे असते. हेच ओळखून अ‍ॅमेझॉनने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ही नवी संधी बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी अन्य शहरांमध्येही तिचा विस्तार केला जाईल.

अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना दोन तासांत त्यांच्या घरी पोहोचविल्या जातात. याचेच पुढचे पाऊल ठरणार आहे अ‍ॅमेझॉन फ्लेक्स यामुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. अर्थात आपला चालू व्यवसाय किंवा नोकरी सांभाळूनही लोकांना हे काम करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन फ्लेक्समध्ये कोणालाही चार तास काम करून प्रतितास १२० ते १४० रुपये कमाविता येतील.  त्यांना दर आठवड्याच्या बुधवारी पगार दिला जाईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News