भारतातील अग्रगण्य आयआयटी संस्थेचे आणि विद्यापिठांचे मोफत कोर्सेस , आजच करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 30 August 2019

भारतातील अग्रगण्य आयआयटी संस्थांनी मिळून मोफत कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. आपल्यामधील खुप जणांना याबद्दल माहिती असेलच. मात्र यामधील काही कोर्स व्हिडियोच्या स्वरुपात सुद्धा उपलब्ध आहेत.

येथे आपल्याला अनेक मान्यवर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकेल. जगभरातील कुणीही त्यांचा लाभ मोफत घेऊ शकतो. जिथे अनुभवी शिक्षकांची कमतरता आहे अश्या ठिकाणी या उपक्रमाचा फायदा करून  घेता येईल. तसेच ज्यांना आपला ज्ञान वाढवायचं असेल त्यांच्यासाठीही हे उपयुक्त आहे. यासाठी आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता.

http://nptel.ac.in/ 

पुढील विषयावरील अभ्यासक्रम :

एअरोस्पेस, ऑटोमोबाइल, केमिकल, बायोकेमिस्ट्री, सिव्हील, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, खाणकाम, समुद्रीविज्ञान, वस्त्रोद्योग यासारख्या इंजिनीअरिंगमधील शाखा तसेच केमिस्ट्री, फिजिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण या विज्ञान शाखांशिवाय व्यवस्थापन, मानसशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संभाषण कौशल्य यासारख्या विषयांवरील लेक्चर सध्या उपलब्ध आहेत.

सध्या काही कोर्सेस ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही तुमच्या gmail account वरून खालील दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकता. 
https://onlinecourses.nptel.ac.in/explorer

अशाच प्रकारची www.saylor.org ही एक साईट आहे. त्यावर अनेक विषयांवर ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. कोणत्याही अमेरिकन विद्यापीठात एखाद्या पदवीचा हा अभ्यासक्रम वाटेल अश्याप्रकारे हे कोर्सेस डिझाईन केले आहेत. त्याव्यतिरिक्त एम.आय.टी आणि हावर्ड ओपनचे कोर्सेसही चांगले असतात.

एम आय टी, हार्वर्ड, बर्कली सारख्या अग्रगण्य विद्यापिठांचे अनेक कोर्सेस https://www.edx.org या संस्थळावरून मोफत घेता येतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News