बॉसचं वागणं आणि कामाचा ताण आल्यास या गोष्टी करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपली धावपळ सुरू होते. ऑफिसची तयारी, वेळेत पोचण्यासाठी वेगानं गाडी चालवणं, ऑफिसमधली कामं, टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन, बॉसचं वागणं, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं या सर्व गोष्टींचा मनावर ताण येतो. सायंकाळी घरी आल्यानंतरही ऑफिसचे काम,ई-मेल, व्हॉट्‌सअप मेसेज यामुळे घरच्यांसाठी आणि स्वतःसाठीही वेळ उरत नाही. दुसऱ्या दिवशी परत हेच चक्र. अशीच अनेकांची दिनचर्या असते.

सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपली धावपळ सुरू होते. ऑफिसची तयारी, वेळेत पोचण्यासाठी वेगानं गाडी चालवणं, ऑफिसमधली कामं, टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन, बॉसचं वागणं, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं या सर्व गोष्टींचा मनावर ताण येतो. सायंकाळी घरी आल्यानंतरही ऑफिसचे काम,ई-मेल, व्हॉट्‌सअप मेसेज यामुळे घरच्यांसाठी आणि स्वतःसाठीही वेळ उरत नाही. दुसऱ्या दिवशी परत हेच चक्र. अशीच अनेकांची दिनचर्या असते.

रविवारी सुटी असते; पण रविवारही जास्तच बिझी जातो. एकाच प्रकारची दिनचर्या, सलग ३६५ दिवस उसंत न घेता सुरू राहिली, तर परफॉर्मन्स वाढण्याऐवजी कमी होणारच. मनावरचा ताण वाढत जातो आणि तो वाजवीपेक्षा जास्त वाढला की समस्या उद्‌भवतात. एखादा वॉटरपंप खूप वेळ सुरू ठेवला, तर काय होतं? मशीन गरम होतं, तो पंप निकामी होतो. समजा खूप पाणी भरणं गरजेचं असेल, तरीही पंप तासन्‌ तास चालवला जात नाही. एक-दोन तासांनी तो काही वेळासाठी बंद करतात. मशीन थंड झाल्यावर पुन्हा सुरू करतात. असं केलं, तरच तो पंप जास्त दिवस काम करतो. यंत्राला विश्रांतीची गरज असते, तशीच मानवी मेंदूलाही असते, हे आपण विचारातच घेत नाही.

सकाळी झोपेतून उठल्यापासून डोक्‍यात एकच विचार ऑफिसचा, कामाचा. रात्री झोपतानाही तोच विचार, तेच टेन्शन. स्वप्नातही तेच दिसतं. यंत्र गरम झालं तर बंद करता येतं, पण मनात सुरू असलेल्या विचारांना बंद कसं करायचं? मनातले विचार बंद करता येत नाहीत. पण त्यांची ‘दिशा’ बदलता येते. आपल्याला दिनचर्या बदलता येणार नाही, कारण त्या गोष्टी करिअरसाठी महत्त्वाच्या असतात. दिवसातल्या ठराविक वेळी आपल्या विचारांची दिशा बदलता येते. हे रोज केलं तर उत्साह, एकाग्रता टिकून ठेवता येते.त्यासाठी काही उपाय करता येतात. 

१) एखादा छंद असेल तर दिवसभरातील काही वेळ त्यात मन रमवा.
२) किमान एक तास मैदानी खेळ, स्वीमिंग व्यायाम यात घालवा. त्यामुळे शरीर थकलं असलं, तरी मनाचा उत्साह, स्टॅमिना वाढतो.
३) जिवलग मित्र-मैत्रिणीसोबत एक-दोन तास घालवा. गप्पा मारा. फिरायला जा. अधूनमधून चित्रपटाला जा.
४) आठवड्यातून एक दिवस ऑफिसचं काम हा विषय डोक्‍यातून काढून टाका. तो दिवस ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, अशा गोष्टीत घालवा. उदा. सहल, टीव्ही बघणं, मित्रांसोबत मौजमजा करणं, आवडता खेळ खेळणं इ.
५) रोज मेडिटेशन, रिलॅक्‍सेशन करायची सवय लावा. हे उपाय वापरले, तर मनावर ताण निर्माण करणारे विचार काही काळासाठी आपण खंडित करू शकतो व करिअरमधील आपला परफॉर्मन्स टिकवून ठेवू शकतो. तसेच घरातही सुसंवाद वाढवू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News