स्कार्फचा असा होतो, कलात्मक वापर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून दोन्ही खांद्यांवरून त्याची दोन्ही टोके सोडून दिल्यास छान लुक देतो.

हल्ली जीन्स असो वा कुर्ती, बाहेरील प्रदूषणापासून वाचण्यासाठी आपण स्कार्फचा वापर नक्कीच करीत असतो. ईप्सित स्थळी पोचल्यावर हा स्कार्फ कसाबसा गुंडाळून बॅगेत टाकला जातो. या स्कार्फचा आपल्याला अनेक ठिकाणी कलात्मक वापर करता येतो. 

स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून दोन्ही खांद्यांवरून त्याची दोन्ही टोके सोडून दिल्यास छान लुक देतो. स्कार्फ दुहेरी करून गळ्यात टाकल्यानंतर मधल्या टोकातून स्कार्फची दुसरी टोके बाहेर काढल्यास तो टायसारखा लुक देतो. 

स्कार्फ डोक्‍यावरून घ्यायचा असल्यास आधी डोक्‍यावरून अलगद घेऊन त्याच्या एका टोकाला सैलसर गाठ बांधून दुसरे टोक त्या गाठीतून घाला आणि तयार झालेले लूप हलकेच ओढा. हा लुकही छान दिसतो. 

हल्ली बाजारात स्कार्फपासून तयार केलेले जॅकेटसुद्धा मिळतात. हे जॅकेट तुम्हाला हटके लुक देतील. तुम्हीही वापरात नसलेल्या स्कार्फपासून अथवा ओढणीपासून असे जॅकेट बनवू शकता.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News