बॉडी बनवण्यासाठी याचा वापर कधीच करू नका..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • आपली बॉडी खूप छान असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जण बॉडी बनवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतात.
  • काही मुलं जिमला जातात तर काही प्रोटिन्स घेतात. तर काही जण घरातल्या घरात उपाय करतात. स्टेरॉइड हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल.
  • याचा वापर बॉडीबिल्ड करण्यासाठी होतो. तुम्ही हे कुठेनाकुठे ऐकलंच असेल की, काही अक्टर्स कमी वेळेत बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइड किंवा इंजेक्शनचा वापर करतात.

आपली बॉडी खूप छान असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जण बॉडी बनवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतात. काही मुलं जिमला जातात तर काही प्रोटिन्स घेतात. तर काही जण घरातल्या घरात उपाय करतात. स्टेरॉइड हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. याचा वापर बॉडीबिल्ड करण्यासाठी होतो. तुम्ही हे कुठेनाकुठे ऐकलंच असेल की, काही अक्टर्स कमी वेळेत बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइड किंवा इंजेक्शनचा वापर करतात.

काहीजण याला इंजेक्शन म्हणतात, तर काही जण  याला स्टेरॉइड म्हणतात. बॉडी बनवण्याच्या नादापायी यापासून होणाऱ्या नुकसानाचा काहीही विचार न करता याचा वापर सुरू करतात. मग त्यानंतर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे यावे लागते. याचा बॉडी बनवण्यासाठी वापर का  करू नये हे आम्ही सांगणार आहोत. 

स्टेरॉइड हा एक असा पदार्थ  आहे, जो आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. तसेच हे एक नैसर्गिक रासायनिक पदार्थाचं रूपही आहे. याचा वापर एखाद्या विशेष आजाराच्या उपचारावेळी केला जातो. त्याचबरोबर स्टेरॉइडला एक असं औषध म्हणून ओळखलं जातं जे मांसपेशींचा विकास करतं. अनेकदा काही खेळाडू , अक्टर्स  याचा वापर करतात .

पण याचा वापर करणे हानिकारक आहे. पुरूषांमध्ये मानसिक रूपाने समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे त्यांना वाटत असतं की, स्टेरॉइडचा वापर बंद केल्याने त्यांच्या मांसपेशी आणि शक्ती कमी होईल. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही खेळाडू अनेकदा जास्त काळ स्टेरॉइडचा वापर करत राहतात. स्टेरॉइडचा फार जास्त वापर केल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. स्टेरॉइडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो. तसेच याने अनेक जीवघेण्या समस्या होण्याचाही धोका होऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News