शाहरुख-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम

काजल डांगे
Saturday, 22 June 2019

‘ओम शांती ओम’नंतर दीपिका-शाहरूख ‘चेन्नई एक्‍स्प्रेस’ चित्रपटात एकत्रित दिसले आणि त्यांच्या या चित्रपटावरही प्रेक्षकांनी तितकेच किंबहुना अधिक प्रेम केले.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा पहिलावहिला हिंदी चित्रपट किंग खान शाहरूखबरोबर केला आणि तो चित्रपट होता ‘ओम शांती ओम’. या जोडीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट. आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अगदी भुरळ घातली. ‘ओम शांती ओम’नंतर दीपिका-शाहरूख ‘चेन्नई एक्‍स्प्रेस’ चित्रपटात एकत्रित दिसले आणि त्यांच्या या चित्रपटावरही प्रेक्षकांनी तितकेच किंबहुना अधिक प्रेम केले.

मुंबई ते रामेश्‍वरम्‌ या प्रवासादरम्यान शाहरूख दीपिकाच्या प्रेमात पडतो आणि दीपिकाही त्याला भुलते. हे सारंच अगदी फिल्मी असलं तरी प्रेक्षकांना ही कथा आवडली. दीपिका-शाहरूखने या चित्रपटात साकारेलली भूमिका प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी होती. या चित्रपटातील शाहरूखच्या एका संवादाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि तो संवाद म्हणजे ‘डोण्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’.

शाहरूखने अगदी त्याच्या रोमॅण्टिक अंदाजातही हा संवाद दीपिकाला म्हणून दाखवला. आजही हा संवाद प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतो. सुरेश क्रिशनन यांनी लेखन तर रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडीबरोबरच ॲक्‍शन सीन्सचाही मसाला होता. या चित्रपटामधील गाण्यांनीही प्रेक्षकांना थिरकायला लावलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News