बचावलो... इरई धरणात खेकडेच नाहीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 7 July 2019

सेनेचे मत्री सावंतांच्या खेकडा लॉजिकपासून शहरवासी सुरक्षित 

चंद्रपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीला शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी ‘खेकड्यांना जबाबदार ठरले. तेव्हापासून चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. शहरापासून २० कि.मी अंतरावरील इरई धरणात खेकडे तर नाही? अशी भीती चंद्रपूरवासींना सतावत होती. मात्र, आता वीज केंद्राच्या अधिका-यांनीच इरईत खेकडे नाही, हे स्पष्ट केले. त्यामुळे सध्यातरी सावंत यांच्या ‘खेकडा लॉजिकचा इरई धरणाला धोका नाही. 

तिवरे धरण फुटून तब्बल २३ जणांना जीव गमवावा लागला. या धरणफुटी घटनेच्या चौकशीसाठी समि ती नेम‘ण्यात आली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. मात्र, समितीच्या अहवालापूर्वी मंत्री सावंत यांनी धरणफुटीला खेकड्यांना जबाबदार धरले आणि नव्या वादाला तोंड फु ट ले. समाजमाध्यमावर सावंत आणि खेकड्यांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणात खेकड्यांच्या स्थितीबाबत समाज माध्यमावर गतीशीर प्रतिक्रिया उम टायला सुरवात झाली.

खेकड्यांमुळे इरई धोक्यात असे इशारे देण्यात येत आहे. मात्र, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजीव घुगे यांनी इरई धरणात खेकडे नाही. जे काही थोडेफार आहे. ते धरणाच्या बॅकवॉटर‘म ध्ये असतील, असे त्यांनी सांगितले. खेकड्यांचा आणि धरण ङ्कुटींच्या नव्या थेअरीवर त्यांनी भाष्य करणे टाळले. परंतु इरई धरण सुरक्षित आहे. त्याला कोणताही धोका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सेफ्टी ऑर्गनाझेशन, नाशिककडून ‘मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर अशी वर्षातून दोनदा धरणाची तपासणी केली जाते. यावर्षी ‘मान्सूनपूर्व तपासणी झाली आहे. अगदी किरकोळ लिकेज आहे. ते दुरूस्त करण्याच्या सूचना आहे.  अहवालानुसार धरण पूर्णत: सुरक्षित आहे. त्यांनाही धरणातील पाण्यात धोकादायक जीवजंतु आढळले नाही. पाण्याचा विसर्ग होते. ते बांधकाम सिमेंट क्राँकिट आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चारशे मीटरचे बांधकाम  मातीचे आहे. तिथे जलचर छोटे छिद्र करू शकतात. परंतु आपल्याकडे तपासणीत असे छिद्र आढळले नाही, असेही घुगे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर आता चद्रपूर शहरवासींना खेकड्यांची काळजी करण्याचे कारण नाही. इरई आणि शहरवासींवरचे खेकडे संकट टळले आहे. परंतु  सावंत यांनी शोधलेल्या धरणफुटीच्या कारणांमुळे सध्यातरी खेकड्यांचा समाजमाध्यमावर भाव चांगलाच वधरला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News