व्हायरल करायचं असेल तर हे करा

व्हायरल
Thursday, 11 April 2019

सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचे अनेकजन चटकन लक्षात अणून देतात. यात गैर नाही. परंतु याच सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी देखील घडतात. तेंव्हा त्या गोष्टी सुद्धा समाजापुढे यायला हव्यात.

अशीच घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून घडली आणि एका बाळांत महिलेस अत्यावश्यक रक्तदान करुन दोन तरुणांनी रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

गर्भवती महिलेच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रसुतीपूर्वीच महिलेच्या पोटातील बाळ दगावल्याने बाळांत महिलेला वाचविण्याकरिता शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. 

महिलेच्या अंगात हिमोग्लोबिनची मात्रा खुपच कमी होती. या मुळे महिलेस रक्त देऊन आॅपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. घरच्यांचे प्रयत्न सुरुच होते. परंतु तीचा रक्तगट ‘बी’ निगेटिव्ह असल्याने शहरातील कुठल्याही रक्तपेढीत या ग्रुपचे रक्त उपलब्ध नव्हते. त्यामुळे सरपंच यांनी आकाशवाणीचे निवेदक राम तरटे यांना फोन करुन माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता संबंधीत रक्तगटाची गरज असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला.

नांदेडसह परभणी, हिंगोली येथील एकाही रक्तपेढीत ‘बी’ निगेटीव्ह हा रक्तगट मिळत नव्हता. दुसरीकडे शहर पोलिस वाहतूक शाखेचे पोलिस व काही पत्रकार यांचे या रक्तगटाची व्यक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरुच होते.

शेवटी मुंबई येथे स्थाईक एका व्यक्तीने पोस्ट वाचुन त्यांच्या दोन मित्रांना रात्रीच्या सव्वा बाराच्या सुमारास रुग्णालयात पाठविले. हि दोन नव तरुण जणु एखाद्या दुता प्रमाणेच या महिलेस रक्त देण्यासाठी मध्यरात्री धावून आले आणि रक्तदान करुन गेले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News