परिश्रमाने मिळवली डिस्ट्रिब्युटरशिप

श्रीनिवास दुध्याल
Wednesday, 8 May 2019

आजकालचे तरुण नोकरी व रोजगार नाही म्हणत असतात. मात्र, मार्केटिंग क्षेत्रात भरपूर पैसा आहे. त्यासाठी मेहनत, जिद्द व चिकाटी हवी आहे. बेरोजगार या क्षेत्रात आल्यास त्यांना विविध संधी आपोआप मिळून जातात. मी पदवीधर आहे. नोकरी करताना मला मालक होण्याचीही संधी मिळाली. तरुणांनी कामाची लाज न बाळगता मार्केटिंग क्षेत्रात यावे. 

 

सोलापूर - दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थी...एका शाळेत आठ वर्षे 250 ते अडीच हजार रुपये पगारावर केली शिपायाची नोकरी... यादरम्यान रात्र प्रशालेत दहावी शिक्षण पूर्ण करून बहिःस्थ बीए, एमए व पत्रकारितेचीही घेतली पदवी...घरच्या परिस्थितीमुळे शाळेची नोकरी सोडून बॅंक रिकव्हरीची केली कामे...2012पासून एका गॅस शेगडीच्या एजन्सीमध्ये मार्केटिंग अधिकारी म्हणून कार्यरत राहिले... मार्केटिंगच्या अनुभवातून मुद्रा लोन काढून आता स्वत: तीन कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप मिळवली...नोकरी न सोडता स्वत:चा उद्योगही सांभाळणारा हा अवलिया युवक आहे पूर्व भागातील जुने विडी घरकुल येथील श्रीनिवास यन्नम..

श्री. यन्नम यांच्या मातु:श्री (कै.) नरसम्माबाई विडी कामगार होत्या. वडिलांचे छोटेसे जनरल स्टोअर्स होते, मात्र पाच-सहा वर्षांपासून बंद आहे. दहावी अनुत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षे विनाअनुदान शाळेत शिपायाची नोकरी केल्याने श्री. यन्नम कुठल्याही कामाला लाजत नाहीत. शिक्षणाची आवड असल्याने नोकरी करतच त्यांनी बीए पूर्ण केले. आवड असल्याने पत्रकारितेची पदवीही घेतली. मात्र, त्यांना 2012 मध्ये एका गॅस शेगडी एजन्सीत मार्केटिंगची नोकरी मिळाली. मार्केटिंगनिमित्त सोलापूर जिल्ह्यासह लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत फिरताना त्यांच्याशी अनेकांच्या ओळखी वाढल्या. अन्‌ त्यातच भविष्यातील मार्ग सापडला. 

यादरम्यान त्यांनी मुद्रा योजनेतून दोन लाखांचे कर्ज घेऊन स्वत:च्या व्यवसायास प्रारंभ केला. होम अप्लायन्सेस, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व प्लास्टिक घरगुती वापराच्या वस्तू अशा तीन कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप मिळवली. आधीची नोकरी न सोडता त्यांनी दोन महिन्यांपासून स्वत:च्याही वस्तूंचे मार्केटिंग सुरू केले आहे. या कामात त्यांनी दोघांना रोजगार दिला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News