तरूणाईकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अश्लेषा ननवरे
Saturday, 29 June 2019

जगात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण समाज्याला काहीतरी देणं आहे, असं वाटतं असतं. याचं विचारातून "यूबीएम" या तरूणाईच्या ग्रुपने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत वाटप करण्याचा मानस केला आहे.

मुंबई : ज्या समागात आपण जन्मतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, याचं विचारातून यूबीएम या तरूणाईच्या ग्रुपने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. विक्रोळी (पूर्व)च्या उत्कर्ष बाल मंदिर शाळेत "यूबीएम" या तरूणाईने उपक्रमाला सुरूवात केली.

विशेष म्हणजे ५० विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि शालेय वस्तू वाटप केले. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्‍हावी, तसेच त्‍यांना शिक्षणासाठी प्रोत्‍साहन मिळावे, या एकमेव उद्देशाने हे वाटप करण्यात आले, असे यूबीएम ग्रुपने सांगितले. 

सर्व माजी विद्यार्थींना मोफत शालेय वस्तू वाटप करण्याची इच्‍छा पहिल्यांदा मी आपल्या कुटूंबातील सदस्‍यांसमोर मांडली. त्यांनी माझ्या भावना समजून लगेच पाठिंबा दर्शविला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप व इतर साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी अक्षय सुर्वे, प्रणाली मोरे, दीपक बंदपते, बाळाराम गायकवाड, जय गुडेकर, करिष्मा केसरकर, स्वप्नील चौदरी, नसरीन शेख, सिद्धेश थोरांत, भूषण सिंग, सुनील पुजारी, भाग्यश्री यादव, तेजस कांबळे, स्नेहल मस्के, स्नेहल धुडवाडकर, नितेश कांबळे, वृषाली सकपाळ, प्रतिक चव्हाण, अवधूत पाटील, विनायक पांढरे, रेश्मा गडकरी आणि दीपिका पाटील इ. यूबीएम मधील सदस्य उपस्थित होते. या उपक्रमात मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

यूबीएम ग्रुपने यापूर्वी असे उपक्रम राबवून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत केली आहे. यंदाचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. या पुढे अशाच प्रकारे कार्य करत राहू. वह्या वाटपप्रसंगी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून मनाला मनस्‍वी समाधान मिळाले, असे यूबीएम सदस्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News