दिशा पटानीचा नवा 'टायगर'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे व अभिनेत्री दिशा पटानी यांनी एकत्र केलेल्या डीनरची सध्या समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे. दिशा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्‍वभूमीवर दिशाचे आदित्य यांच्यासोबतचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ‘ट्रोल’ केले आहे. त्यासोबतच दिशा पटानीचा नवा 'टायगर' असल्याचे अनेक नेटकऱ्यानी म्हटले आहे.

कपड्यांवरूनही ती अनेकदा ट्रोल झाली आहे. आता हे नवे कोलीत नेटकऱ्यांच्या हाती लागले आहे. ‘टायगर कहां है’, ‘अब टायगर का क्‍या होगा’, ‘अब फिर एक बार टाइगर के पैर में चोट लगने वाली है’, असे म्हणत त्यांनी दिशाला ट्रोल केले आहे. आदित्य ठाकरेंनाही नेटकऱ्यांनी अनेक प्रश्‍न विचारले आहेत.

खरंतर दिशा पटानीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.<

#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News