पावसाळ्यात होणारे 'हे' आजार; खूप भयंकर असतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्यच. पावसात भिजल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे सर्दी होते. योग्य प्रकारची काळजी घेतल्यास साधारणपणे चारपाच दिवसांत किंवा आठवड्यात सर्दी कमी होते.

पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्यच. पावसात भिजल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे सर्दी होते. योग्य प्रकारची काळजी घेतल्यास साधारणपणे चारपाच दिवसांत किंवा आठवड्यात सर्दी कमी होते. खालील घरगुती उपायांनीही सर्दी-खोकल्यावर नियंत्रण मिळवता येते. स्वयंपाकघरातील हळद औषधी आहे. सर्दी-खोकल्यावरही ती फायदेशीर असते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास हळकुंड जाळून त्याचा धूर घ्यावा. त्यामुळे नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल. 

सर्दीमुळे अनेकदा नाक बंद होते. अशावेळी काळेमिरे, वेलची आणि जिऱ्याच्या बिया समप्रमाणात घेऊन एका सुती कापड्यात बांधून त्याचा वास घ्यावा. त्यानंतर शिंका येऊन आराम मिळेल. 

पावसात भिजणे शक्‍यतो टाळावे. तरीही भिजल्यास लगेच डोके, शरीर कोरडे करावे. सर्दी-खोकला हा एक हलकाफुलका आजार आहे. त्याची लक्षणे एक आठवडा किंवा त्याहून कमी काळ असतात. पण, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्यायला हवे. सर्दीची लक्षणे जाणवत असतील, तर औषध घेऊनसुद्धा ठरावीक काळ त्रास होतोच. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News