शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर वेतन अधीक्षकांसोबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • पगारातील फरक लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात
     

मानोरा :  येथील वेतन अधीक्षक कार्यालयामध्ये शनिवारी (ता.३) श्रीकांत देशपांडे यांच्या सुचनेप्रमाणे वाशीम जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगाराबाबत वेतन अधीक्षक श्री. कदम यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा करण्यासाठी शिक्षक आघाडी वाशीमचे मार्गदर्शक दिलीप जोशी, वाशीम जिल्हाध्यक्ष रमेश आरू, कायम निमंत्रीत खराटे, निवासी उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव बेहरे, उपाध्यक्ष रवि अंभोरे, शिक्षक आघाडी वाशीमचे श्री. साबळे वाशीम तालुका अध्यक्ष राठोड, मालेगांव तालुका अध्यक्ष श्री.ताकतोडे, कारंजा तालुका अध्यक्ष श्री.उजवणे, रिसोड तालुका अध्यक्ष श्री. घुगे, मंगरुनाथ तालुका अध्यक्ष श्री. बेलखेडे ,मानोरा तालुका अध्यक्ष विकास चौधरी हे उपस्थित होते.

वाशीम जिल्ह्यातील शिक्षकांचा वेतनाचा पहिला टप्पा ता. ऑगस्टला शिक्षक व कर्मचारी यांच्या खात्यात जमा करावा, या अगोदर २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांच्या सातव्या वेतन आयोगाचा २८ महिन्याचा पगारातील फरक लवकर कर्मचारी यांच्या खात्यात जमा होणार आहे.कारंजा येथील एम.जी.ज्यू.कॉलेज यांच्या वेतना बदल चर्चा झाली. सदर प्राध्यापकांचे मे व जूनचे वेतन लवकर खात्यात जमा होणार आहे.
 जी. पी. एफ देयके या अगोदरचा एक टप्पा शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर यानंतर राहिलेल्या जीपीएफ देयके लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली. मेडिकल देयक सुद्धा लवकरच निकालात काढले जातील असे यावेळी सांगण्यात आले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News