शासकीय-अनुदानित आश्रमशाळांमध्ये भेदभाव होतोय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने कलाशिक्षकांची भरती करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे

आदिवासी विकास विभागाने अनुदानित आश्रमशाळांमध्येही कलाशिक्षकांच्या भरतीसाठीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी होत आहे.

अकोला - राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने कलाशिक्षकांची भरती करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. मात्र राज्यातील अनुदानित आश्रमशाळांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनुदानित आश्रमशाळांमधील मुले आदिवासींची नाहीत का ? असा सवाल करत आदिवासी विकास विभागाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच अनुदानित आदिवासी आश्रमशाळांनाही कंत्राटी पद्धतीने कलाशिक्षक नेमण्याची परवानगी देण्याची मागणी शिक्षण संघर्ष संघटनेने केली आहे.

आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत विविध आदिवासी एकात्मिक प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय आदिवसी आश्रमशाळांमध्ये कलाशिक्षकांची २० हजार रुपये एवढ्या एकत्रित मानधनावर नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी संघटनांच्या मागणीनंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र कलाशिक्षकांची भरती प्रक्रिया ही केवळ शासकीय आश्रमशाळांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली असून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना त्यातून डावलण्यात आले आहे. अनुदानित आश्रमशाळांमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यावर यामुळे अन्याय होत  आहे. अनुदानित आश्रमशाळा तुलनेने अधिक चांगल्या असून त्यांची विद्यार्थीसंख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने अनुदानित आश्रमशाळांमध्येही कलाशिक्षकांच्या भरतीसाठीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News