शिक्षण समितीच्या कारभारावर सदस्यांची नाराजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • विविध विषयांवर गाजली सभा; चित्रीकरणाचा ठराव पारित 

यवतमाळ: शिक्षण समितीत घेण्यात आलेला ठराव दुसर्‍या दिवसीय बदलण्यात आल्याने समिती सदस्यांनी शिक्षण समितीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे घेण्यात येणार्‍या सर्व विशेष सभा या चित्रीकरणात घेण्यात यावे असा ठराव जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य स्वाती येंडे यांनी मांडला या ठरावाला एकमताने सदस्यांनी सुद्धा पाठिंबा देवून पारित केला.

शिक्षण व आरोग्य सभापती कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी(ता.8) ला शिक्षण समितीची सभा बोलाविण्यात आली होती. सभेदरम्यान मागील सभेत निमंत्रीत सदस्यांची नियुक्त रद्द करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र, हा ठराव दुसर्‍यादिवशी बदल करून इतिवृत्तावर केवळ चर्चा झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे होणार्‍या सर्व सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, अशी मागणी वजा ठराव सभेत मांडण्यात आला. 

हा ठराव सदस्यांनी एकमताने पारित करून, यापुढे शिक्षण समितीच्या प्रत्येक सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली. त्याचबरोबर शिक्षण समितीची सभा देखील ही मिटींग हॉलमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी सुद्धा सदस्यांनी केली या मागणीला सभापती कालिंदा पवार यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे शिक्षण समितीच्या प्रत्येक विशेष सभा या मिटींग हॉलमध्येच होणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आपण पारदर्शकेत काम करत असेल तर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सभेत बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी सभेदरम्यान केली.

मात्र, यावर विचार करावा लागेल अशी भूमिका अधिकार्‍यांकडून घेण्यात आल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चला उधाण आले आहे. तसेच निमंत्रीत सदस्यांना सभेमध्ये काय अधिकार आहे. याबाबत शासनाचे आदेशाचे वाचन करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली असता निमंत्रीत सदस्यांच्या अधिकाराचे वाचन करण्यात आले. त्यामुळे निमंत्रीत सदस्यांची चांगलीच गोची झाली. एकत्रित आज बोलाविल्या शिक्षण समितीत सदस्यांनी समितीच्या कारभारावरच सदस्यांनी नाराजी दाखविल्याचे चित्र सभेत दिसून आले.

निमंत्रीत सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव
शिक्षण समितीत मांडण्यात आलेला ठराव बदलून केवळ चर्चा झाल्याचे नमुद करण्यात आल्याने सदस्य स्वाती येंडे यांनी स्वतः निमंत्रीत सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News