भारतीय सघांत निवड न झाल्याने निराश! या फलंदाजाची कबुली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • निवड समितीने रविवारी कसोटी, एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी २० अशा तीन प्रकारांसाठी तीन भिन्न संघ निवडले.
  • भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी करूनही निवड न झाल्याने  शुभमन गिलने व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केल्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी किमान एका संघात, तरी निवड अपेक्षित होती, अशी खंत शुभमन गिल याने व्यक्त केली आहे. 

निवड समितीने रविवारी कसोटी, एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी २० अशा तीन प्रकारांसाठी तीन भिन्न संघ निवडले. त्यात भारत अ संघातील मनीष पांडे, श्रेयस अय्यर, खलील अहमद, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल चहर या सात खेळाडूंची निवड केली. भारत अ संघाच्या निवडीची रविवारी आतूरतेने प्रतीक्षा करीत होतो.

तीनपैकी एका तरी संघात निवड होईल, असे वाटत होते. एकाही संघात निवड न झाल्याने खूपच निराश आहे; पण मी त्याचा जास्त विचार करणार नाही. मी धावा करीत राहणार, असे शुभमनने सांगितले. प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार गिल सध्या वेटिंग लिस्टवर आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News