वायुसेनेतील 'गरुड कमांडोज' पदासाठी थेट भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

भारतीय वायुसेनेतील 'गरुड कमांडोज' या पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, थेट पद्धतीने होणा-या या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.
 

भरती प्रक्रियेची पात्रता व अटी :
जन्म तारीख : १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ या दरम्यानचा जन्म असावा. 

भारतीय वायुसेनेतील 'गरुड कमांडोज' या पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, थेट पद्धतीने होणा-या या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.
 

भरती प्रक्रियेची पात्रता व अटी :
जन्म तारीख : १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ या दरम्यानचा जन्म असावा. 

शैक्षणिक : १२ वी उत्तीर्ण, इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत, तसेच कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के सरासरी गुण आवश्यक आहेत.
 

उंची : १५२.५ सेमी (कमीत कमी)

आवश्यक कागदपत्रे : 

  • - मूळ १० वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती. 
  • - मूळ १२ वी गुणपत्रिका आणि ४ प्रती. 
  • - मूळ १२ वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती. 
  • - १० फोटो (पासपोर्ट आकारातील).

23 जुलै 
रोजी होणा-या भरतीमध्ये पुणे, ठाणे, सोलापूर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, यवतमाळ अशा एकूण 14 जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. 

26 जुलै 
रोजी होणा-या कॅम्पमध्ये अहमदनगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा अशा एकूण 13 जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. 

भरती ठिकाण :- पुणे (भोसरी-पिंपरी चिंचवड) 

अधिक माहिती - www.airmenselection.cdac.in आणि indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News