सेमीफायनलमध्ये दिनेश, भुवनेश्वरची बत्ती गुल? असं दादांनी सुचवलंय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

भारताच्या संघात सेमीफायनमध्ये कोणाला स्थान मिळणार कोणाला नाही? या चर्चा चालू असतानाच माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचं मत मांडलं आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी केदार जाधव आणि मोहम्मद शमीला संधी द्यावी असा सल्ला गांगुलीने विराटला दिला आहे.

मँचेस्टर : भारताच्या संघात सेमीफायनमध्ये कोणाला स्थान मिळणार कोणाला नाही? या चर्चा चालू असतानाच माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचं मत मांडलं आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी केदार जाधव आणि मोहम्मद शमीला संधी द्यावी असा सल्ला गांगुलीने विराटला दिला आहे.

तसेच, कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेण्यापेक्षा केदार जाधवला संधी दिल्यास सहावा गोलंदाज म्हणून तो उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय जडेजाही संघात असल्याने भारताकडे फलंदाजांची कुमक शेवटपर्यंत उपलब्ध राहिल असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय संघात सध्या दोन वेगवान गोलंदाज असून मोहम्मद शमीला चार सामन्यात संधी देण्यात आली होती. यात त्यानं 14 गडी बाद करून जबरदस्त कामगिरी केली होती. त्याला सेमीफायनलला पुन्हा घ्यावं असं मत गांगुलीने व्यक्त केलं आहे. भुवनेश्वर हा शेवटच्या षटकात कमी धावा देत असला तरी सेमीफायनलला तुम्हाला विकेट घेणारा गोलंदाज हवा आहे. त्यामुळे मोहम्मद शमी त्यासाठी योग्य असल्याचं गांगुलीने सांगितलं.

दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी सामने संपले असून सेमिफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 7 जुलैला पहिला सामना मँचेस्टरवर तर 11 जुलैला दुसरा सामना बर्मिंगहमवर होणार असून अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News