शंकरआण्णांच्या पदयात्रेचा खडतर प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • माळावर  विश्रांती...बांधावर संवाद, शाळेत मुक्काम, भर पावसात पायी प्रवास
     

माळाकोळी  :  अवघड डोंगर चढत ...ओढ्यातील वाहत्या पाण्यातुन.... झाड-झुडपांतुन वाट काढत ....तसेच पाऊस, वादळात माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरआण्णा धोंडगे यांचा पदयात्रेत प्रवास सुरु आहे.  विकासाची पाऊलवाट तयार करण्यासाठी ओलांडलेले शंकरआण्णा मतदारसंघात 1400 किमी पायी प्रवास करुन मतदारांशी संवाद साधत आहेत . यावेळी प्रवासात अनेक अवघड पाऊलवाटांवरुन जात ज्या गावांमध्ये आजपर्यंत कुठलाही राजकीय नेता पोहचला नाही अशा पाच घरांच्या वस्तीवरही ही पदयात्रा पोहचत आहे. मागील काही दिवसांपासुन परिसरात भीजपाऊस सुरु आहे, या भीजपावसात पदयात्रा स्थगित न करता प्रवास सुरु आहे. ओहळातुन पांदन रस्त्यातुन चिखलाची वाट तुडवत माजी आमदार धोंडगे यांची पदयात्रा दररोज तीस ते पस्तीस किमी पायी प्रवास करत आहे. 
       आगामी विधानसभा निवडणुक जवळ आली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षातील संभाव्य उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातुन शक्तीप्रदर्शन करत तयारी सुरु केली आहे. प्रविण पाटील चिखलीकर वाढदिवसानिमित्त शक्तीप्रदर्शन करत आहेत, तर मुक्तेश्वर धोंडगे यांनी युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रे निमीत्ताने शक्तीप्रदर्शन केले आहे. मात्र शंकरआण्णा धोंडगे यांनी पायी प्रवास करत थेट मतदारांशी संवाद साधत सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

    या पदयात्रेत शंकरआण्णा धोंडगे लहान मोठ्या सर्वच गावांमध्ये पायी जाऊन नागरीकांशी संवाद साधत आहेत. यावेळी ते पायी प्रवास करत असताना पाऊलवाटेचा वापर करत आहेत, थेट शेतकर्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत आहेत. दुपारची विश्रांती शेतातीलच झाडाखाली होत आहे, तर रात्रीचा मुक्काम कधी शाळेत तर कधी कार्यकर्त्यांच्या ओसरीत सर्वांसोबत होत आहे. यावेळी माजी आमदार धोंडगे यांच्या कार्यकाळात पुर्ण झालेल्या साठवण तलाव पुलकम बंधारा कामाचे जलपुजन करण्यात येत आहे.

      कंधार लोहा हा भाग डोंगराळ, माळराण व कोरडवाहु जमीनीचा आहे, येथील सिंचन, शिक्षण, दळणवळण व रोजगार याबाबतीत हा भाग इतर भागाच्या तुलनेत मागे आहे. या भागाच्या शाश्वत विकासासाठी सर्वप्रथम सिंचन व रोजगाराचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे हे जाणुनच माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी सर्वप्रथम सोळा वर्षापुर्वी या भागात पदयात्रा केली होती. त्या पदयात्रेतुन केलेल्या पाहणीचा तसेच अभ्यासाच्या बळावर त्यांनी 2009 साली आमदार झाल्यावर त्यांनी येथे सतरा साठवण साठवण तलाव, हजारो सिंचन विहीरी, तसेच रस्ते व ईतर कामे केली आहेत. सिंचन तसेच रोजगार निर्मीतीसाठी शास्वत विकासाच्या कल्पना शेतकरी नेते शंकरआण्णा यांच्याकडेच असुन त्यांनी मतदारसंघाला राज्यात " टाॅप टेन " ला आणण्याचे स्वप्न पाहीले होते, त्या दृष्टीने काम सुरु असताना विरोधकांच्या अपप्रचारामुळे व पैशाच्या राजकारणामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात, त्यामुळे या पदयात्रेचाही फायदा पक्षसंघटना मजबुत होण्याबरोबरच मतदारसंघाच्या विकासासाठी होणार असल्याचा त्यांचा दावा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News