शिक्षणाच्या वेगळ्या प्रवाहाला पसंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • ॲनिमेशनसह विविध अभ्यासक्रमांकडे तरुणाईचा कल
  • पारंपरिक शिक्षणाबरोबर आता कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. यात ॲनिमेशन, इंटेरियर डिझाईन, फॅशन आणि ग्राफिक्‍स डिझाईनसह इतर नव्या अभ्यासक्रमांकडे तरुणाई वळत आहे​

औरंगाबाद - आपल्या पाल्याने डॉक्‍टर, प्राध्यापक, इंजिनिअर, वकील, सीए, शासकीय सेवा या क्षेत्रातच करिअर करावे असा अट्टाहास दशकभरापूर्वी पालकांचा होता. विद्यार्थीही त्या दिशेने प्रयत्न करीत; पण आता काळाबरोबर पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत आहे. आपली आवड, छंद जोपासून स्वयंरोजगार करता येईल, अशाच अभ्यासक्रमाकडे बहुतांश तरुणाईचा कल दिसून येत आहे.

पारंपरिक शिक्षणाबरोबर आता कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. यात ॲनिमेशन, इंटेरियर डिझाईन, फॅशन आणि ग्राफिक्‍स डिझाईनसह इतर नव्या अभ्यासक्रमांकडे तरुणाई वळत आहे. स्वयंरोजगार आणि वेगळे काही करण्याचा उद्देश समोर ठेवत तरुणाई या क्षेत्राला पसंती देत आहे. तंत्रज्ञानाच्या बदलामुळे शिक्षणातही बदल होत आहेत. सद्यःस्थितीत वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, हॉटेल व्यवस्थापन, विधी या अभ्यासक्रमांप्रमाणेच ॲनिमेशन या क्षेत्रातही येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा अभ्यासक्रम सिनेमा, टीव्हीवरील मालिका, कार्टून, सोशल मीडियाशी संबंधित आहे. त्यामुळे या क्षेत्रात विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय स्वयंरोजगार देणारे अभ्यासक्रमही तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News