फिटनेसमध्ये डाएट महत्त्वाचा : कियारा   

कियारा अडवाणी, अभिनेत्री
Monday, 22 July 2019

मी फिटनेसच्या बाबतीत जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे मी रोजच व्यायाम करते. मला एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास मी डान्स करते. डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, असे मला वाटते. हे ही करायचे नसल्यास मी चालायला जाते. सध्या मी व्यायामासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. तो म्हणजे बॉक्सिंग! जमेल तसे मी बॉक्सिंगही करत असते. रोजच्या व्यायामात मी कार्डिओ, स्क्वॅट्स, आणि पुशअप्स करत असते. मी स्वतः ची खूप काळजी घेते. मी अभिनेत्री नसते तरीही मी फिटनेसच्या बाबतीत तेवढेच फॉलो केले असते. 

डाएटचा आपल्या फिटनेसमध्ये महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे मी प्रवासात असले तरीही डाएट पाळतेच. रोज सकाळी उठल्यानंतर मी लिंबूरस घातलेले कोमट पाणी घेते. लिंबूपाणी तुमच्या पूर्ण शरीरासाठी क्लिंझिंगसारखे काम करत असते. त्यामुळे मी त्याला महत्त्व देते. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये एक मोठा वाडगाभर ओट्स आणि फळे घेते. यामध्ये खास करून सफरचंद, मोसंबी, स्टॉबेरीज अशा फळांचा समावेश असतो. मला सर्वाधिक आवडतो तो माझा वर्कआऊट करण्यापूर्वीचा नाश्‍ता. यामध्ये मी सफरचंद खाते व पीनट बटरचा डीपसारखा वापर करते. 

दुपारच्या जेवणात  माझा घरचा डबा असतो. ज्यामध्ये भाजी, चपाती, कडधान्य असे असते. माझे रात्रीचे जेवणही दुपारच्या जेवणासारखेच असते. यामध्ये फक्त भाज्यांमध्ये बदल असतो. तसेच सोबत एखाद्या माशाचा तुकडा असतो. मला मासे खूप आवडतात. त्यामुळे माझ्या जेवणामध्ये मी आवर्जून विविध प्रकारच्या माशांचा समावेश करून घेत असते. डाएट पाळण्यासाठी माझे कुटुंब मला खूप मदत करते. माझे दुपारचे हेल्दी जेवण हे माझे वडील माझ्यासाठी बनवतात. मी दुपारचे जेवण साडेबारा वाजता घेते. त्यामुळे रात्रीचे जेवणही मी लवकरच करते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News