किल्ले-गडकोट म्हणजे दारुड्यांना त्यांच्या बापाची दौलत वाटली का? फुकटचा मार खाल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

एकीकडे ट्रेकिंगच्या माध्यमातून पावसाळ्यात तरुण आणि तरुणी गडकोटांना अभ्यास करत असतात, तर दुसरीकडे याचाच फायदा घेत काही टपोरी टाळक्यांकडून त्याचा दुरूपयोग केला जात आहे.

गेले काही दिवस पावसाचे वातावरण असल्याने निसर्गदेखील खूलून आला आहे. त्यातच इतिहासाची साक्ष असलेले 'किल्ले गडकोट' येथेदेखील पावसाळ्यातील वातावरण पाहाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. एकीकडे ट्रेकिंगच्या माध्यमातून पावसाळ्यात तरुण आणि तरुणी गडकोटांना अभ्यास करत असतात, तर दुसरीकडे याचाच फायदा घेत काही टपोरी टाळक्यांकडून त्याचा दुरूपयोग केला जात आहे. 

गेले काही दिवस गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ताजी उदाहरणे म्हणजे किल्ले अशेरिगड आणि कोल्हापूरचा किल्ले पन्हाळा.

काही दिवसांपूर्वी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिम आखण्यात आली होती. त्यावेळी किल्ल्यावर एका बाजूला गाडीमध्ये काही तरूण दारू पित असताना सापडले, त्यांना गाडीतून बाहेर काढून शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. 

असाच प्रकार काही दिवसांपूर्वी अशेरिगडावर घडला होता. 5 ते 6 लोक तेथे दारू पित बसले होते , त्यांना पत्ता विचारताच जवळच्या गावातले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वनविभागाने मद्यपान करू नका, अशी पाटी लावली असतानादेखील तरुण गडावर संस्कृतीचं नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे पन्हाळा, अशेरि अशा अनेक गडांवर वनविभागाकडून कधीपासून सुरक्षा आणि मद्दपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, हे पाहाणे आता गरजेचे आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

संताप आणि चिड ह्या 2 गोष्टी येतील हि पोस्ट वाचून नमस्कार सह्यद्रिप्रेमी काल आम्ही अशेरिगडावर गेलो होतो.गड जस जस पादक्रंत करत होत तस आम्हाला तिथली नैसर्गिक विविधता आणि त्या परिसरातील माहिती मिळत होती नेहमी प्रमाणेच सुशिक्षीत अडाणी लोकान साठीचा वन विभागाचा बोर्ड दिसला.गडावर मद्यपान करु नये... तरिही खुप सारे ग्रुप त्या गडावर दारू घेऊन जात होते जमेल तस @athlete_harsh @shaileshgholap006 @the_ray_of_sun_gk आणि मयुर लोकाना समजवत होतो की दारू घेऊन जात असल तर पिऊ नका गडाच सौंदर्य राखा पण तरिही एक ग्रुप आम्हाला गडावर दारू पिताना सापडलाच. हा 5 6 लोकांचा ग्रुप गडावर सर्रास दारू पित होता नाव पत्ता विचारल्यावर आम्हाला ह्यानी गाव वालेच आहोत अस सांगितल... अशा लोकाना गडावर येताना वन विभागाचा बोर्ड दिसत नाही आम्ही नीट सांगून हे ऐकत नाही तर अशा वेळी ह्याना प्रेमाने समजवायची गरज आम्हाला भासली ह्या अशेरि गडावर खुप लोक उघडपणे दारूच्या पार्ट्या करतात वन विभागाची चौकी लावायचा म्हटल तरी इथले जवळपासचे स्थानिक लोक वन विभागातील लोकाना जुमानतील का हेच मोठ प्रश्न चिन्ह आहे (गडावर फोडलेली बॉटल तिथे असलेला कचरा त्या दारू पिनरया लोकान कडून साफ करवून घेतला) असा प्रकार कोणत्या हि गडावर दिसल्यास त्वरित त्याना तिथेच आडवा आणि video काढा जय महाराष्ट्र - . . साभार @sahyadrikkers

A post shared by गडकिल्ले (@gadkille) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News