दिया मिर्झा पुन्हा "ह्या" कारणामुळे चर्चैत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

दियाने या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येकालाच जगण्याचं निर्णयस्वातंत्र्य असतं.

अभिनेत्री दिया मिर्झाचा ‘आजाद’ टॅटू सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. दियाची नुकतीच ‘काफिर’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेबसीरिजपासूनच प्रेरित होऊन दियाने ‘आजाद’ हा टॅटू बनवला आहे.

या टॅटू देवनागरी लिपीमध्ये आहे. दियाने या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येकालाच जगण्याचं निर्णयस्वातंत्र्य असतं. या विचारांवरच ही वेबसीरिज आधारित आहे. दिया म्हणते, ‘या वेबसीरिजने मला पुन्हा स्वतंत्रपणे जगायला शिकवलं. आणि हेच स्वातंत्र्य कायम लक्षात राहावं म्हणून मी हा टॅटू कोरला आहे.’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News