धुळ्यातील गंगामाई डी. फार्मसी महाविद्यालयाचे सर्वोत्तम यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे गेल्या एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या औषधनिर्माणशास्त्र (डी. फार्मसी) शाखेचा निकाल नुकताच जाहीर केला.

धुळे - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे गेल्या एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या औषधनिर्माणशास्त्र (डी. फार्मसी) शाखेचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यात नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यात द्वितीय वर्षात मेघना बिरारी आणि पहिल्या वर्षात अतुल वाघ प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयाचे निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम वर्ष डी.फार्मसीचा निकाल ८२ टक्के लागला. त्यात गोपाल भिल (८७.१८ टक्के), अतुल वाघ (८३.८२), जुनैद अन्सारी (८०.२७) हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. द्वितीय वर्ष डी. फार्मसीचा निकाल ८० टक्के लागला. त्यात मेघना बिरारी (८९.६०), तेजल गुंडियाल  (८८.८०), किरण पाखले (८५) हे अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले. यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोहर भदाणे, उपाध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे, अध्यक्ष राघवेंद्र भदाणे, प्राचार्य एस. व्ही. चोरडिया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News