धोनीचं अखेर ठरलं; क्रिकेट सोडून सैन्यात होणार भरती!

जयेश सावंत (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन आव्हान संपुष्टात आल्यानंतर, आता भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. विश्वचषकातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले होते, परंतु आता खुद्द धोनीनेच तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन आव्हान संपुष्टात आल्यानंतर, आता भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. विश्वचषकातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले होते, परंतु आता खुद्द धोनीनेच तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

धोनी निवृत्त होणार नसून सैन्यदलात भरती होणार असल्याचे त्याच्या जवळील माणसांचे म्हणणे आहे. 

धोनी पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळून निवृत्त होणार असल्याचे वृत्त सूत्रांच्या हाती आले आहे, परंतु याआधी तो दोन महिने पॅरामिलिट्री रेजिमेंटसोबत राहणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाणार नाही तर कर्णधार विराट आणि बुमराह यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान आता धोनी दोन महिन्यांसाठी सियाचीनमध्ये भारतीय लष्कारासोबत जाऊ शकतो. धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

धोनी निवृत्तीनंतर काय करणार? हे निश्चित नाही आहे. त्यामुळं तो लष्करातही सामिल होऊ शकतो त्यामुळे जर धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसेल तर, तो सियाचीनमध्ये दोन महिन्यांसाठी बदली घेऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News