#DhoniKeepTheGlove : धोनी आता तू कुणाचंही ऐकायचं नाही! ते ग्लोव्ह ठेवायचं म्हणजे ठेवायचं!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या एक दिवस लष्करासाठी यावरुन वाद ताजा असताना महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हज्‌वरील लष्कराच्या सन्मानचिन्हावरुन आता सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला आहे.

लंडन : भारतीय क्रिकेट संघाच्या एक दिवस लष्करासाठी यावरुन वाद ताजा असताना महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हज्‌वरील लष्कराच्या सन्मानचिन्हावरुन आता सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला आहे. देशभरातील लोकांनी आता धोनीला साथ देत #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग चालवला आहे.

धोनीला हे सन्मानचिन्ह काढून टाकण्याची सूचना भारतीय क्रिकेट मंडळाने करावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली होती. त्यावर धोनीने जे केले ते देशासाठी अभिमानास्पदच असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर धोनीला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. काही चाहत्यांनी तर विश्वकरडंकावरच बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News