फ्रेंच अभिनेत्रीसोबत धनुषचा देसी ठुमका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

नुकतेच ‘एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ फकीर’ चित्रपटाचे ‘मदारी’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

दक्षिण्यात अभिनेता धनुषने ‘एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ फकीर’ या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं.

नुकतेच या चित्रपटाचे ‘मदारी’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात धनुष फ्रेंच अभिनेत्री बेरेनिस बेजोसोबत डान्स करताना दिसतो आहे. या गाण्यात तो बेरेनिसला देसी ठुमके शिकवताना दिसतो आहे.

हे गाणं गायक विशाल ददलानी आणि निखिता गांधी यांनी गायलं आहे; तर संगीतकार अमित त्रिवेदी यांनी हे गाणं कम्पोज केलं आहे. हा चित्रपट २१ जून रोजी भारत, कॅनेडा, यूके, सिंगापूर, यूएसए आणि मलेशिया येथे प्रदर्शित होणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News