राष्ट्रवादीला खिंडार.. या नेत्याचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविलेले शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले पुन्हा स्वगृही परतले आहेत.

दिंडोरी (जि. नाशिक) : लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविलेले शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले पुन्हा स्वगृही परतले आहेत.

शुक्रवारी दुपारी सव्वाबाराला त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात मोठी चुरस बघावयास मिळणार आहे.

याबाबत महाले यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आमंत्रित केले होते. त्यामुळे मी त्या पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. परंतु, तेथे पराभव पत्करावा लागला.

आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचे आमंत्रण दिल्याने पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सहकार नेते सुरेश डोखळे, बाळासाहेब मुरकुटे, ॲड. सुनील निरगुडे, प्रवीण जाधव, पांडुरंग गणोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यापुढे एक सच्चा शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करेन. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष जो निर्णय घेईल त्यावर मी ठाम राहीन.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News