धनंजय मुंडेची सुप्रीम कोर्टात धाव; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे होते आदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे  यांनी खंडपीठाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी दाखल केली आहे. 

काय आहे प्रकरण ?

धनंजय मुंडे यांनी १९९१ साली जगमित्र शुगर फॅक्टरीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड (रत्नाकर गुटे यांचे जावई) यांनी तक्रार दिली होती. कृषी जमीनही अकृषिक केली, असा ठपका धनंजय मुंडेंवर ठेवण्यात आला आहे. तपासी अंमलदारावरही देखील औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राजाभाऊ फड यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News